नंदुरबार (प्रतिनिधी)
शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड (ता. नंदुरबार) येथे राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताहाचा (National Pharmacovigilance Week) शुभारंभ उत्साहात पार पडला. औषधांच्या सुरक्षित वापराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी उद्घाटन केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी फार्माकोव्हिजिलन्सचे औषध सुरक्षा व्यवस्थेमधील महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “औषधांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. फार्माकोव्हिजिलन्स क्षेत्रात भविष्यात मोठ्या संधी आहेत.”
या सप्ताहाचे पहिले आकर्षण म्हणून ई-क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आली. Google Forms च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. फार्माकोव्हिजिलन्सशी संबंधित विषयांवरील ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. वसंत चव्हाण व प्रा. भावना वसावे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. हेमलता वाडिले यांनी केले. तर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. जागृती शेवाळे यांच्यासह प्रा. भूषण गोपाळ, प्रा. कल्याणी चौधरी, प्रा. पूजा गायकवाड, प्रा. रोहिणी पाटील व प्रा. रोहित सोनावणे यांनी परिश्रम घेतले.
या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न
- बिलाडी धरण प्रकल्पाला गती; दीड दशकांच्या अडचणींना अखेर मार्ग डॉ. विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषदेत माहिती; खासदार डॉ. हिना गावित यांची उपस्थिती
- पळाशी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त “समता सप्ताह” उत्साहात साजरा
- शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा १०० टक्के निकाल ; विद्यार्थ्यांनी उंचावला यशाचा आलेख
- घरकुल व नरेगा कामांबाबत अधिकाऱ्यांचे आंदोलन ; नंदुरबारमध्ये प्रशासनाला निवेदन
- महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी–२०२५ : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये आदरांजली
- शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे राष्ट्रीय संविधान दिन उत्साहात साजरा
- वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; नंदुरबारचे युवा जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात


