Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
  • गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
  • चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
  • मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
  • कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
  • नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
  • रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»प्रशासकीय»घरकुल व नरेगा कामांबाबत अधिकाऱ्यांचे आंदोलन ; नंदुरबारमध्ये प्रशासनाला निवेदन
प्रशासकीय

घरकुल व नरेगा कामांबाबत अधिकाऱ्यांचे आंदोलन ; नंदुरबारमध्ये प्रशासनाला निवेदन

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेDecember 8, 2025No Comments58 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार (प्रतिनिधी) घरकुल व नरेगा कार्यक्रमांतर्गत जबाबदारी निर्धारणाबाबत निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, शासनस्तरावर घरकुल व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) संदर्भातील अडचणींबाबत अद्याप स्पष्ट निर्णय न झाल्यामुळे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामकाज करताना अडथळे निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिनांक 6 व 8 डिसेंबर 2025 रोजी सामूहिक रजा आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विकास सेवा महासंघाच्या मार्गदर्शनानुसार राज्यभरातील अधिकारी सामाजिक रजा आंदोलनात सहभागी होत असून, या आंदोलनास नंदुरबार जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

8 डिसेंबर 2025 पासून योग्य तो निर्णय होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या निवेदनावर जिल्ह्यातील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी व सहायक गट विकास अधिकाऱ्यांच्या सह्या असून, संघटना एकत्रितपणे लढा देत असल्याचे चित्र आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, सचिव गणेश मोरे, उपाध्यक्ष उदय कुसुरकर, समन्वयक ईश्वर पवार, कार्याध्यक्ष देविदास देवरे, सहअध्यक्ष अनिल बिरहाडे उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता

March 15, 2026

नंदुरबारमध्ये ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच दिवसांत ५३ लाखांची उलाढाल

March 12, 2026

सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम – सीईओ नमन गोयल, नंदुरबार जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा

February 2, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025618
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.