Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

April 2, 2026

सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?

March 28, 2026

नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?
  • नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
  • लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
  • नंदुरबारमध्ये ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच दिवसांत ५३ लाखांची उलाढाल
  • शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महादेवलाल श्रॉफ व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
  • जनआंदोलनापासून तुकड्या-तुकड्यांच्या आंदोलनापर्यंत: बदलता कामगार संघटनांचा चेहरा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»प्रशासकीय»नंदुरबारमध्ये ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच दिवसांत ५३ लाखांची उलाढाल
प्रशासकीय

नंदुरबारमध्ये ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच दिवसांत ५३ लाखांची उलाढाल

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेMarch 12, 2026No Comments46 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नंदुरबार : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना नंदुरबार जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे १९ हजार स्वयं सहायता समूह कार्यरत असून महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी अभियान प्रभावीपणे काम करीत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर शेजारील डोम येथे २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हास्तरीय ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनाचे उद्घाटन नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲड. गोवाल पाडवी यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी मिताली शेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रकांत पवार, बांधकाम अभियंता शैलेश शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनावणे, महिला व बालकल्याण अधिकारी हरिभाऊ हाके, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक ईश्वर पवार, गटविकास अधिकारी संजय पाटील (नंदुरबार), महेश पतदार (शहादा) यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी खासदार पाडवी यांनी बोलताना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे तसेच ‘उमेद मॉल’ संकल्पनेद्वारे बचत गटांच्या उत्पादनांना नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक चंद्रकांत पवार यांनी केले. या प्रदर्शनात एकूण ११० स्टॉल उभारण्यात आले होते. त्यापैकी २० स्टॉल खाद्यपदार्थ विक्रीचे, तर ९० स्टॉल विविध हस्तकला व घरगुती उत्पादनांच्या विक्रीचे होते. मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलना भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची पाहणी केली आणि बचत गटातील महिलांशी संवाद साधला.
प्रदर्शनाच्या आयोजनात जिल्हा अभियान व्यवस्थापक यशवंत ठाकूर, लेखाधिकारी मनीषा कुलकर्णी, जिल्हा व्यवस्थापक (आर्थिक समावेशन) उमेश अहिरराव, कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत चावरे, जिल्हा व्यवस्थापक (मार्केटिंग) अंकुश राठोड, जिल्हा व्यवस्थापक (उपजीविका) कुणाल कानडे यांच्यासह तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व प्रभाग समन्वयक सक्रिय होते. याशिवाय जिल्ह्यातील विविध बचत गटांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रदर्शनादरम्यान आयोजित करण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण ठरले. नगरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच निवडक महिलांना वैयक्तिक उद्योग व्यवसाय उभारणीसाठी बँकांकडून सॅंक्शन लेटर देण्यात आले व समूह गुंतवणूक निधीचे धनादेशही मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
दरम्यान, पाच दिवस चाललेल्या या विक्री प्रदर्शनात बचत गटांच्या विविध उत्पादनांबरोबरच खाद्यपदार्थांच्या विक्रीतून एकूण सुमारे ५३ लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती विभागाने दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता

March 15, 2026

सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम – सीईओ नमन गोयल, नंदुरबार जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा

February 2, 2026

घरकुल व नरेगा कामांबाबत अधिकाऱ्यांचे आंदोलन ; नंदुरबारमध्ये प्रशासनाला निवेदन

December 8, 2025
ताज्या बातम्या

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025799

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025763

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025600

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025563
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.