Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

April 2, 2026

सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?

March 28, 2026

नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?
  • नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
  • लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
  • नंदुरबारमध्ये ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच दिवसांत ५३ लाखांची उलाढाल
  • शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महादेवलाल श्रॉफ व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
  • जनआंदोलनापासून तुकड्या-तुकड्यांच्या आंदोलनापर्यंत: बदलता कामगार संघटनांचा चेहरा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»धार्मिक»वैदिक मंत्रघोषात १०९ कन्यांचे पूजन; कन्यांच्या नेत्रात देवीभाव, पूजकांच्या डोळ्यांत भावाश्रू
धार्मिक

वैदिक मंत्रघोषात १०९ कन्यांचे पूजन; कन्यांच्या नेत्रात देवीभाव, पूजकांच्या डोळ्यांत भावाश्रू

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 28, 2025No Comments15 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नंदुरबार (प्रतिनिधी) नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त शहरात हिंदु सेवा सहाय्य समिती व लताई आरोग्य धाम यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदीपक कन्यापूजन सोहळा संपन्न झाला. मोठा मारुती मंदिर सभागृहात पार पडलेल्या या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात १०९ कन्यांचे वैदिक मंत्रघोषात पूजन करून त्यांना नवीन कपडे, शालेय साहित्य व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कन्यांच्या नेत्रात देवीभाव तर पूजकांच्या डोळ्यांत भावाश्रू दिसत होते.

कार्यक्रमाची सुरुवात श्री दुर्गामातेच्या महाआरतीने झाली. यानंतर मान्यवर व यजमानांच्या हस्ते कन्यांचे पाद्यपूजन करून विधिवत पूजन करण्यात आले. सर्व कन्यांना नवीन पोशाख परिधान करून शालेय उपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले. कन्याभोजनाच्या माध्यमातून या कन्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भागवतकार हभप अविनाश महाराज जोशी, राजेशभैय्या परदेशी, डॉ. त्र्यंबक पाटील, डॉ. धर्मेंद्र जैन, डॉ. प्रीती ठाकरे, डॉ. सीमा जैन, शाखा व्यवस्थापक सागर बारोटे, विलास जोशी महाराज, हभप राजेंद्र कुलकर्णी, पंडित रविंद्र पाठक, नरेंद्र थेटे गुरुजी, जया जैन, केंद्र प्रमुख नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. नरेंद्र पाटील यांनी नवरात्रीतील कन्यापूजनाचे महत्त्व स्पष्ट करून पुढील वर्षी इतिहासात कधीही न झालेला भव्य कन्यापूजन सोहळा करण्याची घोषणा केली. मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रीती ठाकरे म्हणाल्या, “स्त्रीचा सन्मान फक्त नवरात्रीत नव्हे, तर रोजच केला पाहिजे. कन्यापूजनाइतकेच पुण्य स्त्रीसन्मानातून मिळते. मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणेही अत्यावश्यक आहे.”
आशीर्वचनात हभप अविनाश जोशी महाराज म्हणाले, “घरी नवरात्रीत नऊ कुमारिका मिळणे कठीण जाते, परंतु येथे दरवर्षी १०९ कन्यांचे पूजन करण्याचे सौभाग्य मिळते. नारी ही शक्तीस्वरूप आहे. दररोज तिची उपासना व्हावी, हेच या पूजनाचे महत्त्व आहे.”
कार्यक्रमात संघटनेची प्रार्थना जागृती पाटील हिने केली. वैदिक मंत्रघोष अविनाश महाराज जोशी यांनी, महाआरती विलास महाराज जोशी यांनी केली. सूत्रसंचालन राजू चौधरी यांनी केले, तर आभार विनायक राजपूत यांनी मानले.
सोहळ्याची सांगता महिषासुरमर्दिनी स्तोत्राच्या गजरात १०९ कन्यांवर पुष्पवृष्टी करून करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक व लताई आरोग्य धामचे विश्वस्त यांनी परिश्रम घेतले.
Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी शनिमांडळ येथील जागृत देवस्थान श्री शनिमहाराजांच्या चरणी १०१ ग्रामस्थांच्या हस्ते रुद्राभिषेक व महामृत्युंजय पूजा; जिल्हाभरातून सदिच्छांचा वर्षाव

February 1, 2026

“धर्म, त्याग आणि राष्ट्रभक्तीचा महामहोत्सव – गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शहीदी शताब्दी सोहळ्याची जय्यत तयारी”

October 11, 2025

‘दुर्गा दौड’मधे डॉ. विजयकुमार गावित यांचा उत्साही सहभाग; श्रद्धा व राष्ट्रप्रेमाचा संगम

September 30, 2025
ताज्या बातम्या

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025799

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025763

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025600

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025563
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.