Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026

धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

September 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
  • धडगावच्या भीषण अपघातातील जखमींच्या भेटीसाठी रतनदादा पाडवी रुग्णालयात; जखमींची विचारपूस करत दिला धीर
  • सामाजिक बांधिलकी जपत ‘अक्का माय फाउंडेशन’चा उपक्रम; होळ तर्फे रणाळा येथे पाणी जार वितरण
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त
शैक्षणिक

गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेAugust 3, 2026No Comments115 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास तसेच शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा अभिवादन सोहळा उत्साहात पार पडला. भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्याविषयीचा आदर आणि ऋण व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यादायिनी माता सरस्वती आणि महर्षी व्यास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ध्रुव सहाणे याने प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले.

यावेळी प्रमुख वक्ते राजेंद्र पाटील यांनी महर्षी व्यास यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्याचा सविस्तर परिचय करून दिला. भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान सर्वोच्च असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्यांनी विविध उदाहरणे, कथा आणि प्रेरणादायी प्रसंगांच्या माध्यमातून सांगितले. आधुनिक काळातही शिक्षक हे विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक असून त्यांचे संस्कारच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया रचतात, असेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जयदीप नटावदकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टिका पाडवी, ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे, सुनिल पाटील, विजया न्हायदे, भुपेंद्र पाटील, संतोष पाटील, गौरीशंकर धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

इयत्ता दहावी ‘ई’ तुकडीतील विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दहावी ‘ई’ तुकडीतील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कु. प्राची मराठे आणि शफक खाटीक यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर नचिकेत अर्थेकर याने उपस्थितांचे आभार मानले.

गुरुंच्या ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 23, 2026

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन

August 8, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.