Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

April 2, 2026

सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?

March 28, 2026

नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?
  • नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
  • लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
  • नंदुरबारमध्ये ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच दिवसांत ५३ लाखांची उलाढाल
  • शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महादेवलाल श्रॉफ व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
  • जनआंदोलनापासून तुकड्या-तुकड्यांच्या आंदोलनापर्यंत: बदलता कामगार संघटनांचा चेहरा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न
शैक्षणिक

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेDecember 15, 2025No Comments64 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter
नंदुरबार (प्रतिनिधी) शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नंदुरबार येथे दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम तसेच पालक सभा यशस्वीरीत्या पार पडली.
    हा कार्यक्रम प्राचार्य प्रा. पंकज एम. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य चौधरी यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्यपूर्ण अभ्यास व नैतिक मूल्यांचा अंगीकार करून आपले शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवन घडवावे, असे आवाहन केले. पालक व संस्था यांच्यातील योग्य समन्वयातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले. इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची शैक्षणिक रचना, नियमावली, अभ्यासक्रम व विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. फार्मसी शिक्षणाचे महत्त्व, शिस्तीचे पालन आणि अभ्यासासोबत नैतिक मूल्ये जपण्याचे महत्त्व प्रा. तश्विता मगरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून स्पष्ट केले.
     या कार्यक्रमास पालकवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक सभेमध्ये पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी पालक श्री. अशोक बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या शैक्षणिक कार्यपद्धतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक समितीने विशेष परिश्रम घेतले. समितीमध्ये प्रा. कल्याणी चौधरी, प्रा. जागृती शेवाळे, प्रा. पूजा गायकवाड, प्रा. भावना वसावे, प्रा. रोहिणी पाटील व प्रा. श्रद्धा पाटील यांचा समावेश होता.
      कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या अध्यक्षा योगीता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन व कौतुक केले.
Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महादेवलाल श्रॉफ व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

March 6, 2026

पळाशी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त “समता सप्ताह” उत्साहात साजरा

December 10, 2025

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा १०० टक्के निकाल ; विद्यार्थ्यांनी उंचावला यशाचा आलेख

December 8, 2025
ताज्या बातम्या

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025799

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025763

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025600

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025563
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.