Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कोपरगाव येथे होणाऱ्या सब-ज्युनिअर राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघाची निवड

February 3, 2026

सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम – सीईओ नमन गोयल, नंदुरबार जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा

February 2, 2026

विकसित भारत २०४७ ची पायाभरणी करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – विजय चौधरी, भाजपा नंदुरबार जिल्हा कार्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर पत्रकार परिषद

February 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोपरगाव येथे होणाऱ्या सब-ज्युनिअर राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघाची निवड
  • सेवापुर्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम – सीईओ नमन गोयल, नंदुरबार जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा
  • विकसित भारत २०४७ ची पायाभरणी करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – विजय चौधरी, भाजपा नंदुरबार जिल्हा कार्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर पत्रकार परिषद
  • ग्रामीण रोजगार धोरणात नवा अध्याय : VB GRAM G मुळे विकासाभिमुख परिवर्तन
  • डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी शनिमांडळ येथील जागृत देवस्थान श्री शनिमहाराजांच्या चरणी १०१ ग्रामस्थांच्या हस्ते रुद्राभिषेक व महामृत्युंजय पूजा; जिल्हाभरातून सदिच्छांचा वर्षाव
  • नंदुरबारचे सुपुत्र मनोज श्रॉफ यांचा फोर्ब्स यादीत गौरव जागतिक उद्योगविश्वातील भारतीय नेतृत्वाचा अभिमान
  • शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न
  • बिलाडी धरण प्रकल्पाला गती; दीड दशकांच्या अडचणींना अखेर मार्ग डॉ. विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषदेत माहिती; खासदार डॉ. हिना गावित यांची उपस्थिती
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा
शैक्षणिक

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 25, 2025No Comments74 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

बामदोड (नंदुरबार), दि. २५ सप्टेंबर २०२५ –
शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे जागतिक फार्मासिस्ट दिन सामाजिक जाणीव, सांस्कृतिक उपक्रम आणि आरोग्यविषयक जनजागृतीच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने झाली. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली. त्यानंतर मोफत आरोग्य तपासणी शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी परिसरात झाडे लावून हरित संदेश दिला.

जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर नाटिका (स्ट्रीट प्ले) सादर करून औषधांचा योग्य वापर, दुष्परिणाम आणि फार्मासिस्टची महत्त्वाची भूमिका जनतेसमोर प्रभावीपणे मांडली.

संस्कृती व कलेला प्रोत्साहन देण्यासाठी रांगोळी स्पर्धा व रिल स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेशासोबत कलात्मक कल्पकता सादर केली. तसेच प्रबोधनात्मक रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये “फार्मासिस्ट म्हणजे आरोग्याचा रक्षक” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विशेष अतिथी व्याख्यान. क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना फार्मासिस्टच्या जबाबदाऱ्या, उद्योगातील संधी व भविष्यातील दिशा याबाबत मार्गदर्शन केले.

या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. भूषण गोपाळ, प्रा. कल्याणी चौधरी, प्रा. जागृती शेवाळे, प्रा. भावना वसावे, प्रा. पूजा गायकवाड, प्रा. हेमलता वाडिले, प्रा. रोहिणी पाटील व प्रा. रोहित सोनावणे यांनी केले.

संस्थेच्या अध्यक्षा योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील आणि प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून उपक्रमांच्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे इंडक्शन प्रोग्राम व पालक सभा संपन्न

December 15, 2025

पळाशी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त “समता सप्ताह” उत्साहात साजरा

December 10, 2025

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचा १०० टक्के निकाल ; विद्यार्थ्यांनी उंचावला यशाचा आलेख

December 8, 2025
ताज्या बातम्या

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025798

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025763

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025598

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025561
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.