Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
  • गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
  • चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
  • मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
  • कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
  • नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
  • रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
क्राईम

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेAugust 23, 2026No Comments119 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना आपल्या बुद्धी-कौशल्याने, तपासातील अनुभवाने आणि गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे अनेक गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे पोलीस अंमलदार श्री. अभय शशिकांत राजपूत यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव पुरस्कार-२०२६’ प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला.

धुळे येथील गुरुकुल फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभय राजपूत यांच्या उल्लेखनीय पोलीस सेवेचा गौरव करण्यात आला. गंभीर गुन्ह्यांचा तपास, आरोपींचा माग काढणे तसेच विविध महत्त्वपूर्ण पोलीस कारवायांमध्ये त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना अभय राजपूत यांनी घरफोडी, चोरी, खून, दरोडा, जबरी चोरी यांसह विविध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास करून अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अनेक वेळा गुन्ह्यांचा तपास अत्यंत आव्हानात्मक आणि क्लिष्ट असतानाही त्यांनी गोपनीय माहिती, तपास कौशल्य आणि बारकाईने केलेल्या निरीक्षणाच्या आधारे गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळविले.

गुन्हे उघडकीस आणताना त्यांनी दाखविलेली तत्परता, बुद्धिमत्ता, अचूक नियोजन, तपासातील सातत्य आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांच्या कार्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. विविध मोठ्या कारवायांमध्ये त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या नावलौकिकात भर पडली आहे.

अभय राजपूत यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गुरुकुल फाउंडेशन, धुळे यांच्या वतीने त्यांना ‘सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव पुरस्कार-२०२६’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याला मिळालेला हा सन्मान निश्चितच त्यांच्या सहकाऱ्यांसाठी आणि मित्रपरिवारासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल पोलीस अंमलदार अभय शशिकांत राजपूत यांचे मित्रपरिवार, सहकारी, हितचिंतक आणि नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

August 15, 2026

सोशल मीडियावर तलवारीचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; लोखंडी तलवार जप्त

August 3, 2026

आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी

June 27, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025618
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.