Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेAugust 15, 2026No Comments100 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि शहर पोलिसांची संयुक्त कारवाई; तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला नंदुरबार-नवापूर मार्गावरून ताब्यात

नंदुरबार : जिल्ह्यात वाढत्या मालमत्तेविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने धुळे येथील सराईत असल्याचे पोलिसांच्या नोंदीत असलेल्या एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून नंदुरबार जिल्ह्यातील घरफोडीचे तब्बल चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 10 लाख 02 हजार 126 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा वाढता आलेख लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीमती अस्विनी सानप यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांवर कठोरपणे नियंत्रण मिळविण्याचे निर्देश दिले होते. गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांनी जिल्ह्यात दाखल असलेल्या मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा सखोल अभ्यास सुरू केला. विविध गुन्ह्यांची पद्धत, घटनास्थळे आणि संशयितांची माहिती तपासताना नंदुरबार शहर व शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या काही घरफोड्यांमध्ये साम्य असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे आणि उपलब्ध गुन्हेगारी अभिलेखांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. नंदुरबारसह शहादा तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशातील संभाव्य हालचालींचाही तपास करण्यात आला.

गुप्त माहितीने तपासाला मिळाली निर्णायक दिशा

दरम्यान, 14 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हेमंत गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. 8 ऑगस्ट रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटीलपाडा परिसरातील महाराणा प्रताप नगर येथे झालेल्या घरफोडीच्या घटनेशी धुळे येथील सराईत आरोपीचा संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे विशेष पथकाने नंदुरबार ते नवापूर मार्गावरील विविध पाड्यांमध्ये संशयिताचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांच्या पथकाच्या हाती एक संशयित इसम लागला. चौकशीत त्याने आपले नाव इम्रान शेख खालील शेख (वय 30, रा. अजमेरा नगर, खडीपेठी, धुळे, ह.मु. नंदुरबार) असे सांगितले.

पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत नंदुरबार शहर व शहादा परिसरातील घरफोडीच्या घटनांबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार तपास पुढे नेत पोलिसांनी त्याच्याकडून 10 लाख 02 हजार 126 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस

पोलिसांच्या तपासात नंदुरबार शहर व शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खालील चार गुन्ह्यांची उकल झाल्याचे समोर आले आहे—

  1. नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 744/2026 — BNS 331(4), 305
  2. नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 712/2026 — BNS 331(4), 305
  3. नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 762/2026 — BNS 331(4), 305
  4. शहादा पोलीस ठाणे गु.र.नं. 781/2026 — BNS 331(4), 331(5), 305

ताब्यातील आरोपीविरुद्ध धुळे, नंदुरबार आणि नाशिक ग्रामीण परिसरात यापूर्वीही मालमत्तेविषयक गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नंदुरबार जिल्ह्यात आणखी काही गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे का, तसेच त्याचे अन्य साथीदार आहेत का, याचा तपास सध्या सुरू आहे.

गुन्हेगारीवर वॉच; पोलिसांच्या तपास पद्धतीचे कौतुक

या कारवाईत पोलिसांनी केवळ आरोपीला ताब्यात घेण्यापुरती मर्यादा न ठेवता गुन्ह्यांची पद्धत, तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे आणि पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदी यांचा समन्वय साधत तपासाला दिशा दिली. त्यामुळे एकाच कारवाईत चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच चोरीस गेलेला लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

या कारवाईमुळे मालमत्तेविषयक गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर नंदुरबार पोलिसांची करडी नजर असून, जिल्ह्यातील नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासन गंभीर असल्याचा संदेशही गेला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीमती अस्विनी सानप यांनी सांगितले की, ताब्यातील आरोपीने नंदुरबार जिल्ह्यात आणखी काही गुन्हे केले आहेत का, याबाबत तपास सुरू आहे. तसेच त्याच्या संभाव्य साथीदारांचाही शोध घेण्यात येत असून, मालमत्तेविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांची कारवाई यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहणार आहे.

या पथकाची उल्लेखनीय कामगिरी

पोलीस अधीक्षक श्रीमती अस्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वायकर, पोलीस हवालदार राकेश मोरे, भाऊसाहेब डमर, अमर राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील, सचिन वसावे, तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल नागरे आणि आनंद मराठे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.

लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करून चार घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करणाऱ्या नंदुरबार पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत असून, आगामी काळातही अशाच प्रभावी कारवायांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

सोशल मीडियावर तलवारीचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; लोखंडी तलवार जप्त

August 3, 2026

आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी

June 27, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.