Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»आकीब असलम धोबी यांची महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
स्थानिक बातम्या

आकीब असलम धोबी यांची महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJuly 18, 2026No Comments74 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

 

नंदुरबार : महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी आकीब असलम धोबी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक कार्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार, संस्थापक अध्यक्ष प्रवीण समाधान भोंटकर यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी आणि श्रमिक कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याच्या उद्देशाने आकीब धोबी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

संघटनेच्या नियमांचे व उद्दिष्टांचे पालन करत गरजू रुग्णांना मदत करणे, श्रमिक कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

नियुक्तीनंतर आकीब असलम धोबी यांनी संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, रुग्णसेवा आणि श्रमिक कामगारांच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, त्यांच्या नियुक्तीचे विविध सामाजिक, राजकीय, कामगार तसेच रुग्णसेवा क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले असून त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णसेवा आणि श्रमिक कामगारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.