Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत

August 27, 2026

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक

August 23, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • नांदेड हल्ला : SAD च्या राजकीय विघटनाचे गंभीर संकेत
  • गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान
  • चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा-लोणखेडा येथे भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक
  • मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड
  • कै. श्री. पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांची ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सांत्वनभेट
  • नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • जिल्ह्याच्या विकासकामांना गती; ऑक्टोबरअखेर अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश
  • रस्त्यांच्या दुरवस्थेवर पालकमंत्र्यांची तीव्र नाराजी; आता दर महिन्याला तालुकानिहाय आढावा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»जिल्हा परिषद केंद्र शाळा पळशी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात
शैक्षणिक

जिल्हा परिषद केंद्र शाळा पळशी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJune 15, 2026No Comments68 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

पळशी, ता. अक्कलकुवा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्र शाळा पळशी, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत पळशी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

प्रवेशोत्सवानिमित्त नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण व पूजन करून त्यांच्या पायांचे शुभ ठसे उमटवत शाळेत स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थी व पालकांसाठी आकर्षक सेल्फी पॉईंटची उभारणी करण्यात आली होती. या सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी व पालकांनी आनंदाने छायाचित्रे काढून प्रवेशोत्सवाच्या आठवणी जतन केल्या.

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय जीवनाबद्दल सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांना फेटे बांधून गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत पालक, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत संपूर्ण गावात जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता, आपलेपणाची भावना आणि शिक्षणाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र मुख्याध्यापिका सरिता साबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गांगुर्डे, सरपंच भालेराव कोकणी, सदस्य संतोष कोकणी, ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर गंडे, उपशिक्षक पुरुषोत्तम काळे, उपशिक्षिका सुलोचना वळवी, प्रभारी केंद्रप्रमुख कैलास सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 23, 2026

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन

August 8, 2026

गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त

August 3, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,118

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025790

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025618
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.