Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»आंतरराज्यीय घरफोडी टोळी जेरबंद; १७.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार गुन्हे उघड
क्राईम

आंतरराज्यीय घरफोडी टोळी जेरबंद; १७.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार गुन्हे उघड

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJune 8, 2026No Comments56 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार, दि. ८ जून : सारंगखेडा परिसरात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोडीच्या घटनांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १७ लाख ३४ हजार ४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. नंदुरबार येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी ही माहिती दिली.

सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील बोराळे गावात २९ मेच्या रात्री युवराज शंकर माळी व किशोर भरत पाटील यांच्या घरांचे मागील दरवाजे तोडून अज्ञात चोरट्यांनी ६ लाख १५ हजार २०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय नांदरखेडा, फेस आणि तोरखेडा येथेही घरफोडीच्या घटना घडल्याने पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान होते.

पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला. १ जून रोजी जयनगर गावाजवळ विनानंबर युनिकॉर्न दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या मिठाराम भावसिंग तडवी (वय ३४, रा. मुहाला, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपासात त्याने साथीदार रतला मालसिंग तडवी व जगदिश प्रताप तडवी यांच्या मदतीने सारंगखेडा परिसरात अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून ५ लाख ८३ हजार ५० रुपयांचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपयांची मोटारसायकल असा एकूण ६ लाख ८३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यानंतर उर्वरित दोन्ही आरोपींनाही अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींकडून एकूण ९९.६१ ग्रॅम वजनाचे १४ लाख ९४ हजार १५० रुपयांचे सोन्याचे दागिने, १ लाख ३९ हजार ८९९ रुपयांचे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली एक लाख रुपयांची मोटारसायकल असा एकूण १७ लाख ३४ हजार ४९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे सारंगखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हा क्रमांक ११०/२०२६, १२५/२०२६, १५७/२०२६ आणि १६०/२०२६ असे चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप व अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सारंगखेडा पोलीस ठाणे तसेच मालमत्तेविरुद्ध तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या पार पाडली.

पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी नागरिकांना घरफोडी रोखण्यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन करताना संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

August 15, 2026

सोशल मीडियावर तलवारीचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; लोखंडी तलवार जप्त

August 3, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.