Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»क्राईम»शहादा पोलिसांची मोठी कारवाई : ४.८१ लाखांचा सुका गांजा जप्त; दोन आरोपी ताब्यात
क्राईम

शहादा पोलिसांची मोठी कारवाई : ४.८१ लाखांचा सुका गांजा जप्त; दोन आरोपी ताब्यात

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेMay 16, 2026No Comments270 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

शहादा (प्रतिनिधी) अवैधरित्या अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना शहादा पोलिसांनी धाडसी कारवाई करत ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २० किलो ५६४ ग्रॅम सुका गांजा व दुचाकीसह एकूण ४ लाख ८१ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दि. १५ मे २०२६ रोजी शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. हेमंतकुमार पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, दोन इसम धडगावकडून असलोद मार्गे शिरपूरकडे मोटारसायकलद्वारे सुका गांजा वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे श्री. पाटील यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पोलीस पथकाने पंचांसह असलोद-दामळदा रोडवरील संस्थानजवळ सापळा रचला. रात्रीच्या सुमारास संशयित अवस्थेत लाल रंगाच्या मोटारसायकलवरून दोन इसम येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली असता मोटारसायकल क्रमांक MH 03 BK 7511 असल्याचे निष्पन्न झाले. संशयितांनी आपली नावे १) सुशिल सुमा पावरा (वय ३०, रा. मोहिदा, ता. शिरपूर, जि. धुळे) व २) गजेंद्र जितेंद्र पावरा (वय २१, रा. मोहिदा, ता. शिरपूर, जि. धुळे) अशी सांगितली. त्यांच्या ताब्यातील बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये २० किलो ५६४ ग्रॅम वजनाचा सुका गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, दुचाकी व इतर साहित्य असा एकूण ४,८१,२८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींकडे गांजा बाळगण्याबाबत कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५५७/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. हेमंतकुमार पाटील, सपोनि श्री. संदीप वाघ, असई अशोक कोळी, पोहेकॉ बहादुर भिलाला, पोशी भगवान सावळे, कपिल मंदील, विकास शिरसाठ, भरत शिंपी व मिथुन सिसोदे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

गुंतागुंतीचे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणणारे नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभय राजपूत यांचा कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

August 23, 2026

नंदुरबार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! सराईत घरफोडी आरोपी जेरबंद; चार गुन्ह्यांची उकल, 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

August 15, 2026

सोशल मीडियावर तलवारीचे प्रदर्शन करून दहशत पसरविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; लोखंडी तलवार जप्त

August 3, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.