Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महादेवलाल श्रॉफ व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महादेवलाल श्रॉफ व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेMarch 6, 2026No Comments76 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार : शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात भारतीय फार्मसीचे जनक महादेवलाल श्रॉफ तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांच्या हस्ते महादेवलाल श्रॉफ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी महान व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करून त्यांच्या कार्याची आठवण काढली.
यावेळी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना भारतीय फार्मसी शिक्षणाच्या उभारणीत महादेवलाल श्रॉफ यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. त्यांनी फार्मसी शिक्षणाला वैज्ञानिक दिशा देत देशातील औषधनिर्मिती क्षेत्राच्या प्रगतीस मोठी चालना दिली. त्यांच्या कार्यामुळे आज भारतात फार्मसी क्षेत्रात मोठी प्रगती होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी, न्यायनिष्ठा आणि आदर्श राज्यकारभारावरही प्रकाश टाकण्यात आला. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून जनतेला सुरक्षित व न्यायपूर्ण राज्य दिले. त्यांचे जीवनकार्य आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी तसेच महादेवलाल श्रॉफ यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची ओळख झाली आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी महान व्यक्तिमत्त्वांच्या आदर्शांचे पालन करून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी

      आयोजनाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील, सचिव श्री गणेश गोविंद पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी सर्वांचे कौतुक केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 23, 2026

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने एकलव्य विद्यालयात रंगला आदिवासी गौरव दिन

August 8, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.