Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

April 2, 2026

सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?

March 28, 2026

नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कर्तृत्व, कठोरता आणि विश्वासाचा चेहरा — हेमंत सुभाष पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  • सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?
  • नाशिक येथे पत्रकार पदविका कोर्समध्ये विशाल गायकवाड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
  • लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता
  • नंदुरबारमध्ये ‘नंदिनी मिनी सरस’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच दिवसांत ५३ लाखांची उलाढाल
  • शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये महादेवलाल श्रॉफ व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
  • जनआंदोलनापासून तुकड्या-तुकड्यांच्या आंदोलनापर्यंत: बदलता कामगार संघटनांचा चेहरा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»राज्य-राष्ट्रीय»विकसित भारत २०४७ ची पायाभरणी करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – विजय चौधरी, भाजपा नंदुरबार जिल्हा कार्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर पत्रकार परिषद
राज्य-राष्ट्रीय

विकसित भारत २०४७ ची पायाभरणी करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – विजय चौधरी, भाजपा नंदुरबार जिल्हा कार्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर पत्रकार परिषद

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेFebruary 2, 2026No Comments8 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

 

नंदुरबार, (दि. २ फेब्रुवारी २०२६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा वाढ, समावेश आणि सुधारणा यांचा समतोल साधणारा असून ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाच्या दिशेने देशाला वेगाने पुढे नेणारा आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश महामंत्री मा. श्री. विजयभाऊ चौधरी यांनी केले. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा कार्यालय, नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, जिल्हाध्यक्ष निलेश माळी व जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी उपस्थित होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत भाजपची भूमिका मांडताना विजय चौधरी यांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक, उद्योजक, कामगार, नोकरदार, गरीब व मध्यमवर्गीय घटकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आहे.
कृषी, एमएसएमई, कौशल्यविकास, पायाभूत सुविधा, आरोग्य, औषधनिर्मिती, शिक्षण, पर्यटन, क्रीडा, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि नवतंत्रज्ञान क्षेत्रांना भरीव प्रोत्साहन देण्यात आले आहे. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षणासाठी मुलींसाठी वसतिगृहे उभारण्याचा निर्णय हा महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आतापर्यंत २५ कोटी नागरिकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यात यश मिळाल्याची नोंद ही सरकारच्या सामाजिक न्यायाच्या धोरणांची प्रचिती असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी देशातील २० महत्त्वाच्या पर्यटन केंद्रांवर १० हजार प्रशिक्षित गाईड तयार करण्यात येणार असून भारताला मेडिकल टुरिझमचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने आरोग्य व आयुष क्षेत्राचा विस्तार करण्यात येणार आहे. Bio-Pharma, Semiconductor Mission, Chemical Parks, Mega Textile Parks यांसारख्या उद्योगांमुळे रोजगारनिर्मितीला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली असून मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे दळणवळण, उद्योग व व्यापाराला चालना मिळणार आहे. एआय, कौशल्यविकास आणि एमएसएमई क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन भारताला आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याचा सरकारचा निर्धार या अर्थसंकल्पातून स्पष्ट होतो, असेही चौधरी यांनी सांगितले.
नवीन आयकर कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार असून करभरणा प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहे. यामुळे मध्यमवर्गीय व नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळेल. एकूणच हा अर्थसंकल्प “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या तत्वज्ञानावर आधारित असून सर्वसामान्यांच्या जीवनमानात सकारात्मक परिवर्तन घडवणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकारांच्या प्रश्नांना विजय चौधरी यांनी समर्पक उत्तरे दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

सीएपीएफमधील आयपीएस नेतृत्वाची भूमिका संस्थात्मकदृष्ट्या का आवश्यक आहे?

March 28, 2026

जनआंदोलनापासून तुकड्या-तुकड्यांच्या आंदोलनापर्यंत: बदलता कामगार संघटनांचा चेहरा

February 17, 2026

नंदुरबारचे सुपुत्र मनोज श्रॉफ यांचा फोर्ब्स यादीत गौरव जागतिक उद्योगविश्वातील भारतीय नेतृत्वाचा अभिमान

January 8, 2026
ताज्या बातम्या

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025799

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025763

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025600

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025563
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.