Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»पदोन्नतीनिमित्त ग्रामपंचायत अधिकारी संजय देवरे यांचा संघटनेतर्फे सत्कार
स्थानिक बातम्या

पदोन्नतीनिमित्त ग्रामपंचायत अधिकारी संजय देवरे यांचा संघटनेतर्फे सत्कार

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJune 16, 2026No Comments14 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

 

नंदुरबार, (प्रतिनिधी) नंदुरबार पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कोळदा येथे कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी श्री. संजय देवरे यांची शहादा येथे पदोन्नतीने नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने पंचायत समिती नंदुरबारच्या सभागृहात त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अधिकारी श्री. दौलत कोकणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी श्री. वाय. डी. पवार, श्री. एन. जी. पाटील तसेच श्री. सागर राजपूत उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी बंधू-भगिनी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी श्री. संजय देवरे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्यासोबत काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या कर्तव्यदक्ष, समन्वयशील आणि संघटनात्मक कार्यपद्धतीमुळे त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. दौलत कोकणी यांनी श्री. देवरे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करताना सांगितले की, “संजय देवरे यांनी ग्रामपंचायत अधिकारी संघटना आणि अधिकारी वर्गासाठी केलेले योगदान नेहमी स्मरणात राहील. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीतील अधिकाऱ्यांना प्रेरणा देणारा आहे.”
कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी सी. आर. करोडीवाल, आर. डी. पवार, बी. डी. देवरे, आरती पाटील, पंकज पिंपळे, चेतना गोसावी, सीमा वेदे, कविता शिंदे, शोभा पाटील, भाऊराव बिराडे, आर. सी. माळी, शरद पवार, तडवी आप्पा, डुडवे आप्पा, महेश पाटील, योगेश पाटील, प्रवीणसिंग गिरासे, अनिल वसावे, सतीश पाटील यांच्यासह अनेक ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले. तर सी. आर. करोडीवाल यांनी आभार प्रदर्शन करून श्री. संजय देवरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थितांनीही त्यांच्या पुढील सेवाकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांना उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट

October 9, 2026
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.