Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 2026

आंतरराज्यीय घरफोडी टोळी जेरबंद; १७.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार गुन्हे उघड

June 8, 2026

रोहिंग्या शिबिरांतील वाढता दहशतवाद आणि बांगलादेशसमोरील सुरक्षा संकट

June 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत
  • आंतरराज्यीय घरफोडी टोळी जेरबंद; १७.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार गुन्हे उघड
  • रोहिंग्या शिबिरांतील वाढता दहशतवाद आणि बांगलादेशसमोरील सुरक्षा संकट
  • सोनसाखळी चोरांच्या आंतरराज्यीय टोळीला बेड्या; १८ गुन्हे उघड, ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • कत्तलखान्याच्या मुद्द्यावर नंदुरबारची राजकीय रणधुमाळी; विरोधकांचा हिंदुत्वाचा सवाल तर सत्ताधाऱ्यांचा प्रसिद्धी स्टंटचा आरोप
  • विकसित भारत 2047 साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्याचा नंदुरबारमध्ये अभिनव उपक्रम
  • शहादा पोलिसांची मोठी कारवाई : ४.८१ लाखांचा सुका गांजा जप्त; दोन आरोपी ताब्यात
  • ऑपरेशन सिंदूर : आधुनिक युद्धातील भारताच्या तांत्रिक सामर्थ्याची प्रभावी झलक
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»स्थानिक बातम्या»कत्तलखान्याच्या मुद्द्यावर नंदुरबारची राजकीय रणधुमाळी; विरोधकांचा हिंदुत्वाचा सवाल तर सत्ताधाऱ्यांचा प्रसिद्धी स्टंटचा आरोप
स्थानिक बातम्या

कत्तलखान्याच्या मुद्द्यावर नंदुरबारची राजकीय रणधुमाळी; विरोधकांचा हिंदुत्वाचा सवाल तर सत्ताधाऱ्यांचा प्रसिद्धी स्टंटचा आरोप

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेJune 1, 2026No Comments53 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

विषय क्रमांक ६ ने पेटवले राजकारण; विरोधक, सत्ताधारी आणि एमआयएमच्या भूमिकेमुळे निर्माण झाले अनेक प्रश्न

नंदुरबार : नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक ६ मुळे नंदुरबारच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. जुन्या पशुवधगृहाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार दुरुस्ती व सुधारणा करण्याचा प्रस्ताव सभेपुढे आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने याला “कत्तलखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न” असे संबोधत तीव्र विरोध केला. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) सत्ताधाऱ्यांनी हा विरोध केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठीचा राजकीय स्टंट असल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे या संपूर्ण वादात एमआयएम नगरसेवकांनी विषयाचे समर्थन करत सत्ताधाऱ्यांचे आभार मानल्याने या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढला आहे.

सभागृहात जे घडले आणि त्यानंतर बाहेर जे बोलले गेले, यामध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र समोर आले आहे. कारण ज्या विषयाला भाजपने हिंदुत्व, गोवंश हत्या आणि जनभावनांशी जोडले, त्याच विषयावर सत्ताधारी शिवसेनेनेही नंतर आंदोलन करत “गोवंश हत्येला आमचाही विरोध आहे” अशी भूमिका घेतली. त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच प्रश्न उपस्थित केला जात आहे की, जर सत्ताधाऱ्यांनाही या विषयाबाबत आक्षेप होता तर तो विषय अजेंड्यावर आलाच कसा?

नगरपालिकेतील प्रशासनिक आणि राजकीय प्रक्रिया पाहता, सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका ही अंतिम स्वरूपात तयार होण्यापूर्वी सत्ताधारी नेतृत्व, नगराध्यक्ष आणि संबंधित पदाधिकाऱ्यांच्या माहितीत असते. त्यामुळे विषय क्रमांक ६ चा समावेश केवळ प्रशासनाची चूक मानणे कठीण असल्याचे जाणकारांचे मत आहे. याच कारणामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहातच या विषयाला विरोध करत सभात्याग केला. त्यानंतर नगरपरिषदेच्या आवारात घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांवर “नकली हिंदुत्व”चा आरोप केला. गोवंश हत्या बंदी कायदा अस्तित्वात असताना आणि २०१५ मध्ये अशाच विषयावर शहरात तणाव निर्माण झाल्याचा दाखला देत भाजपने हा विषय मागे घेण्याची मागणी केली. नगरसेवक पंकज चौधरी यांनी लेखी हरकत नोंदवून जनआंदोलनाचा इशाराही दिला.

दुसरीकडे शिवसेना नगरसेवकांनीही सभेनंतर आंदोलन करून आपण गोवंश हत्येच्या विरोधात असल्याचे जाहीर केले. नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनीही “आम्ही हिंदू असून गोवंश हत्येला विरोध करतो” असे स्पष्ट करत विरोधकांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला. मात्र यामुळेच आणखी एक प्रश्न निर्माण झाला आहे की, जर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या विषयाच्या विरोधात असतील तर मग या प्रस्तावाचा वास्तविक हेतू काय होता?

या संपूर्ण घडामोडीत एमआयएम नगरसेवकांची भूमिका वेगळी ठरली. त्यांनी विषय क्रमांक ६ चे स्वागत करत तो मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सत्ताधाऱ्यांचे आभार मानले आणि विरोधकांनीही या निर्णयाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका मांडली. त्यामुळे आता या विषयाचा खरा लाभ कोणाला होणार होता आणि कोणत्या राजकीय समीकरणातून हा प्रस्ताव पुढे आला, याची चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता हिंदुत्व, गोसंवर्धन आणि धार्मिक भावना या मुद्द्यांवर राजकीय पक्ष आपापली भूमिका अधिक ठळकपणे मांडत आहेत. भाजपने या विषयावर आक्रमक भूमिका घेत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला, तर शिवसेनेनेही आपण हिंदुत्वविरोधी नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. परिणामी मूळ विषयापेक्षा राजकीय संदेश महत्त्वाचा ठरल्याचे दिसून येते.
दरम्यान, शहरातील नागरिकांमध्येही या विषयावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरिकांच्या मते नगरपरिषदेने शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करावे. तर काहींच्या मते इतक्या संवेदनशील विषयावर निर्णय घेण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेऊन जनमत जाणून घेणे आवश्यक आहे.

सध्या विषय क्रमांक ६ हा केवळ एका पशुवधगृहाच्या दुरुस्तीचा प्रशासकीय प्रस्ताव राहिलेला नाही, तर तो नंदुरबारच्या राजकारणातील हिंदुत्व, मतदारांचे ध्रुवीकरण, सत्ताधारी-विरोधक संघर्ष आणि आगामी निवडणुकांच्या रणनीतीशी जोडला गेलेला राजकीय विषय बनला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत सत्ताधारी हा प्रस्ताव मागे घेतात की त्यावर पुढील कार्यवाही करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.

एक मात्र निश्चित आहे की, जर हा विषय पुढे नेण्याचा प्रयत्न झाला तर त्यावरून शहरात आणि जिल्ह्यात मोठे राजकीय आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधक या तिन्ही घटकांनी संवेदनशीलता आणि जबाबदारीची भूमिका घेणे आवश्यक ठरणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

बिलाडी धरण प्रकल्पाला गती; दीड दशकांच्या अडचणींना अखेर मार्ग डॉ. विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषदेत माहिती; खासदार डॉ. हिना गावित यांची उपस्थिती

December 13, 2025

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025

होळ तर्फे हवेली येथे “स्वच्छता ही सेवा २०२५” अभियानांतर्गत स्वच्छता महाश्रमदान

September 25, 2025
ताज्या बातम्या

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025803

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025769

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025602

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025566
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.