Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा

July 16, 2026

मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन

July 15, 2026

ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा
  • मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन
  • ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन
  • संघर्षातून घडलेले नेतृत्व… जनतेच्या विश्वासाचे नाव!
  • विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास… खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
  • आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी
  • नंदुरबार पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; ३५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट
  • शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर चोरट्यांचा डल्ला; ग्रामीण भागातील वाढत्या चोरींनी शेतकरी भयभीत, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»राजकारण»वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; नंदुरबारचे युवा जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात
राजकारण

वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; नंदुरबारचे युवा जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेNovember 20, 2025No Comments516 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

नंदुरबार (प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडीचे नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख युवा नेतृत्व आणि गेल्या चार–पाच वर्षांपासून पक्षाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळणारे युवा जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सूर्यवंशी यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या मोठ्या प्रवेशामुळे भाजपला जिल्ह्यातील युवा वर्गामध्ये अधिक बळ प्राप्त झाले असून वंचित बहुजन आघाडीसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
या प्रवेश सोहळ्यास माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुनील सूर्यवंशी यांच्या प्रवेशानंतर डॉ. गावित यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांचे मनापासून स्वागत केले. गेल्या काही वर्षांत सुनील सूर्यवंशी यांनी जिल्ह्यात मोठा जनसंपर्क वाढवत वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. शाखा विस्तार, युवा संघटन उभारणी आणि सक्रिय कार्यपद्धतीमुळे ते युवकांमध्ये विशेष लोकप्रिय झाले होते आणि त्यांचे काम मुंबईपर्यंत पोहोचले होते.
या कार्यक्रमास भास्कर हिरामण पाटील (चेअरमन – भालेऱ येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्था), लोटन राजधर पाटील (सरपंच – कंढरे) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा ध्वज हाती घेऊन पक्षप्रवेश केला.
भाजपात प्रवेश करताना सुनील सूर्यवंशी म्हणाले, “युवा वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी भाजपची कार्यपद्धती योग्य आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” यावेळी त्यांनी पुढे बोलताना असा विश्वास व्यक्त केला की,
“माजी मंत्री आमदार विजयकुमार गावित, माजी खासदार हिनाताई गावित, प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ माळी आणि आमदार राजेशदादा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात संपूर्ण जिल्हाभर काम करण्याची मौल्यवान संधी मला उपलब्ध होईल.” या प्रवेशामुळे भाजपचे नंदुरबारमधील संघटन अधिक बळकट होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश पक्षासाठी लाभदायक ठरेल, असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

नंदुरबार व तळोद्यात शिवसेनेचे पूर्ण पॅनल; काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी अपयशी — आमदार रघुवंशी ची पत्रकार परिषदेत माहिती

November 18, 2025

भाजपात ‘संसद रत्न’ डॉ. हीना गावित यांचे पुनरागमन : नंदुरबार जिल्ह्यात भाजपला नवी ऊर्जा; येणाऱ्या काळात पक्षाच्या विजयाचा ‘केंद्रीय चेहरा’ ठरण्याची शक्यता

November 3, 2025

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,117

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025809

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025784

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025614
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.