Close Menu
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!

October 12, 2026

दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे

October 10, 2026

किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद

October 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • धडगावच्या दुर्गम भागात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट; जाहिरातींच्या नावाखाली खंडणी वसुलीचे गंभीर आरोप!
  • दुष्काळ निवारणासाठी आ. डॉ. विजयकुमार गावित यांचे शनिदेवाला साकडे
  • किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याचा जागर; ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मोकळा संवाद
  • दुधाळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची भेट
  • धडगाव–सुरवाणी मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी
  • नंदुरबारमध्ये महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’
  • श्रेयवाद बाजूला; नंदुरबारकरांच्या पुणे प्रवासाचा मार्ग सुकर!
  • आदिवासी विकास विभागाच्या थकीत बिलांमुळे कंत्राटदार आर्थिक संकटात; निधी तातडीने देण्याची मागणी
Facebook X (Twitter) Instagram
lokvishwasnewslokvishwasnews
Demo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
lokvishwasnewslokvishwasnews
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्थानिक बातम्या
  • राज्य-राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्राईम
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»त्र्यंबकेश्वर येथील पत्रकार हल्ल्याचा निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा संयुक्तिक पुढाकार
ताज्या बातम्या

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकार हल्ल्याचा निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा संयुक्तिक पुढाकार

जगदिश निळकंठ सोनवणेBy जगदिश निळकंठ सोनवणेSeptember 23, 2025No Comments83 Views
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter
नंदुरबार (प्रतिनिधी) त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वृत्तांकनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर पार्किंगचा ठेका वसूल करणाऱ्या तथाकथित गुंडांनी केलेल्या मारहाणीचा जिल्हा मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे. या संदर्भातील निवेदन आज जिल्हाधिकारी मिताली शेठी यांना देण्यात आले.
    या हल्ल्यात पुढारी न्यूजचे किरण ताजणे, झी २४ तासचे योगेश खरे यांच्यासह इतर पत्रकार जखमी झाले असून घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. “पत्रकार हे लोकशाहीतील चौथा स्तंभ आहेत. त्यांच्यावर हात उचलण्याचे धाडस होणे ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात आहे,” असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
◆ पत्रकार संघाच्या वतीने मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या अशा –
1. हल्लेखोरांवर पत्रकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई व्हावी.
2. संबंधित ठेकेदारास कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करावे.
3. या घटनेत हल्लेखोरांना कोणाचे पाठबळ आहे, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
4. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस यंत्रणा उभारावी.
       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत पार्किंगचा ठेका रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तरीदेखील दोषींना गजाआड करणे व पत्रकार सुरक्षेची हमी देणे आवश्यक असल्याचे पत्रकार संघाने स्पष्ट केले.
      सदर निवेदन देण्याच्या वेळी ज्येष्ठ पत्रकार हिरालाल भाऊ चौधरी व लोकमतचे वरिष्ठ संपादक रमाकांत बापू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी उपस्थित पत्रकारांमध्ये लोकमतचे उपसंपादक मनोज शेलार, दैनिक नंददर्शनचे बाबासाहेब राजपूत, जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक विशाल माळी, IBN लोकमतचे निलेश पवार, ABP माझा चे भिकेस पाटील, सकाळचे धनराज माळी, देशदूतचे संपादक राकेश कलाल, पुण्यनगरीचे अविनाश भामरे, दिव्य मराठीचे जीवन आबा पाटील, वरिष्ठ पत्रकार रणजीत राजपूत, तरुण भारतचे वैभव करंवदकर, लोकमतचे मंगलदास पानपाटील,  टिव्ही 9 चे गौतम बैसाणे, ई-टीव्हीचे ज्ञानेश्वर माळी, शैलेंद्र चौधरी, उमेश पांढरकर, महेंद्र चित्ते, महेंद्र चौधरी, अमित कापडणीस, मिलिंद भालेराव, दीपक सोनार, वरिष्ठ फोटोग्राफर सुनील कुलकर्णी, वीरेंद्र राजपूत यांचा समावेश होता.
     या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष जगदिश निळकंठ सोनवणे यांनी पत्रकारांवरील हल्ल्यांना आळा घालण्यासाठी शासनाने तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांनी स्पष्ट केले की पत्रकारांवरील हल्ले थांबवणे हे समाजहिताचे आणि लोकशाही रक्षणाचे दायित्व आहे.
Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
जगदिश निळकंठ सोनवणे
जगदिश निळकंठ सोनवणे
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 7066606236

Related Posts

लिपिकांच्या मागण्यांवर शासन दरबारी सकारात्मक चर्चा; लवकर निर्णयाची शक्यता

March 15, 2026

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025

रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा : ४० प्रकारच्या रानभाज्यांचे सादरीकरण

September 19, 2025
ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबारात शाळा प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे होणार भव्य स्वागत

June 13, 20261,119

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने नंदुरबार तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त – तातडीने मदतीची मागणी

September 28, 2025813

एनटीव्हीएसचे माजी संचालक व शेकडो शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणात उलथापालथ

November 4, 2025793

“नंदुरबारात वंचितांचा नवसंघर्ष : सुनील भाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय परिवर्तनाचा नवा इतिहास!”

October 26, 2025620
lokvishwasnews
WhatsApp Facebook YouTube
© 2026 LokVishwas News. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.