नंदुरबार/पावला (प्रतिनिधी) – ASK फाउंडेशन मुंबई यांच्या आर्थिक सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस (IGS) व CYDA यांच्या संयुक्त विद्यमाने पावला येथे रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
महोत्सवाचे सूत्रसंचालन मोहसीन मणियार यांनी केले, तर प्रास्ताविक प्रवीण अहिरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र मोरे (DDM, नाबार्ड), दीपक पटेल (प्रकल्प संचालक, आत्मा), पैठणकर साहेब (LDM, SBI), पंकज पाटील (मॅनेजर, ASK फाउंडेशन), सौ. आरती देशमुख (विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा), कांता बनकर (माविम, नंदुरबार), डॉ. शांताराम बडगुजर (सचिव, CYDA), तसेच स्थानिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
मेळाव्यात तब्बल ३५ ते ४० प्रकारच्या रानभाज्यांच्या पाककृतींचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी दीपक पटेल यांनी रानभाज्यांचे जीवनातील महत्व व संवर्धनाची गरज अधोरेखित केली. रवींद्र मोरे यांनी नाबार्डच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. तर पैठणकर यांनी अशा महोत्सवांचे आयोजन शहरांमध्येही करण्याची गरज व्यक्त करत बँकिंग क्षेत्रातून सहकार्याचे आश्वासन दिले. सौ. आरती देशमुख यांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी फायदे सांगून महिलांना वर्षभर उपलब्धतेसाठी सोलर ड्रायर उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
पाककला स्पर्धेत तीन महिलांची विजेते म्हणून निवड झाली. त्यांना बक्षिसे देण्यात आली, तर सहा महिला व एका पुरुषाला प्रोत्साहनपर पुरस्कार व प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाची सांगता CYDA संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक जयश्री सपकाळे यांनी आभार प्रदर्शन करून केली. रानभाजी महोत्सव यशस्वी करण्यासाठी IGS व CYDA संस्थेचे कर्मचारी, जीविका मित्र व CRP यांनी विशेष परिश्रम घेतले.
Trending
- पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर; पर्जन्य, शेती, आरोग्य व विकास कामांचा घेणार आढावा
- मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी नंदुरबार जिल्ह्यात मदत कक्ष कार्यरत विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क क्रमांक जाहीर; नागरिकांना थेट संपर्काचे आवाहन
- ज्येष्ठ शिक्षणप्रेमी कुटुंबातील मातृछत्र हरपले; सौ. नवसाबाई रतीलाल रोकडे यांचे निधन
- संघर्षातून घडलेले नेतृत्व… जनतेच्या विश्वासाचे नाव!
- विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास… खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन
- आंतरराज्यीय मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ३०.३० लाखांच्या ३२ दुचाकी जप्त, नंदुरबार एलसीबीची धडाकेबाज कामगिरी
- नंदुरबार पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम; ३५.२० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक बळकट
- शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर चोरट्यांचा डल्ला; ग्रामीण भागातील वाढत्या चोरींनी शेतकरी भयभीत, पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा


